‘ते’ मैत्र जीवांचे आहेत : गोडखिंडी


सारेच रस मानवी जीवनाशी भावनांची निगडीत आहेत म्हणुनच ते मैत्र जीवांचे आहेत —मीना गोडखिंडी

Advertisement

वाई , ता. १७ः ज्याचा आस्वाद घेता येतो तो रस.विभाव अनुभाव व संचारी भाव यांच्या संयोगातून रस निर्माण होतात रस ही एक मनोवृत्ती आहे रस हा काव्य नाट्यातील एक अभिजात घटक आहे शृंगार हास्य करून रौद्र वीर भयानक विभक्त अद्भुत व शांत हे नवरस आहे हे सारेच रस मानवी जीवनाशी भावनांशी निगडित आहेत म्हणून ते मैत्र जीवांचे आहेत असे मत मीना गोडखिंडी यांनी मांडले लोकमान्य टिळक संस्था संचालित १०८व्या वसंत व्याख्यानमालेच्या सोळाव्या पुष्पात मैत्र जिवांचे नवरस या विषयावर त्या बोलत होत्या यावेळी श्री सरोजकुमार मिठारी हे अध्यक्षस्थानी होते
मीना गोडखिंडी म्हणाल्या पहिला रस हा शृंगार आहे याचे विप्रलंबशृंगार व संभोग शृंगार असे दोन प्रकार आहेत अनेक कवी लेखक यांनी हा रस वापरला नलदमयंती अभिजात शाकुंतल गीतगोविंद मेघदूत यांमध्ये शृंगार रसाचा अंतर्भाव झालेला पाहायला मिळतो कालिदासाने त्याच्यात नाटकांतून शृंगार रसाला उच्च दर्जा मिळवून दिला
दुसरा हास्यरस सामाजिक व्यंगांमुळे या रसाची निर्मिती होते हास्यरसाचे सहा प्रकार आहेत स्मित हासित उपासीत अवहासित इ. या रसामुळे आरोग्य चांगले राहते म्हणूनच हास्य क्लब ची निर्मिती झाली आचार्य अत्रे पु.ल. दमा मिरसदार यांनी त्यांच्या लेखनात हास्य रसाची उधळण केली आहे
तिसऱ्या करूण रसाची राम सीता वियोग रामाचा वनवास श्रावण बाळाचा मृत्यू प्रसंग द्रौपदीचा वस्त्राहरण प्रसंग ही उदाहरणे आहेत कालिदासाचे मेघदूत या रसाचे सर्वात मोठे उदाहरण आहे सध्याच्या काळात भूकंप दुष्काळ जवानांचे शहीद होणे देशाला करूण रसात बुडवतात
चौथा रौद्र रस अपमान विश्वासघात उपहास यांमुळे या रसाची निर्मिती होते महाभारतातील द्रोण पर्वत रोत्र रसाचा वारंवार प्रयोग झाला आहे सध्याच्या राजकीय परिस्थितीतही रौद्र रसाची वारंवार प्रचिती येते
पाचवा वीर रस भारतीय संस्कृती ही वीर रसाची पूजक आहे छत्रपती शिवाजी महाराज तर वीर रसाचे मूर्त रूप आहेत कंस कालयवण शिशुपाल पूतना या वाघांच्या प्रसंगी कृष्णाने वीर रसाची प्रचिती दिली महिषासुरमर्दन झाशीची राणी ते स्वातंत्र्यलढा साऱ्यात वीररस भरलेला आहे
सहावा भयानक रस रोजच्या वृत्तपत्रातील बातम्या भयानक रसाचे उदाहरण वाटतात नैसर्गिक आपत्ती मधून भयानक रस उत्पन्न होतो
सातवा विभाग सरस महाभारत पाणीपत्तातील युद्ध संपल्यावर युद्ध भूमीचे रूप पाहून हा रस उत्पन्न होतो अत्यंत गलिच्छ असून आरोग्यास हानिकारक म्हणूनच स्वच्छता अत्यंत आवश्यक
आठव्या अद्भुत रसामध्ये कृष्णाचे विश्वरूप गोवर्धन पर्वत प्रसंग मेरू पर्वत उच्चाटन महेश सभेतील इंद्रजाल प्रसंग आदींचा समावेश होतो असंभव वाटणाऱ्या कलाकृती अलौकिक कर्तव्य यामुळे या रसाची उत्पत्ती होते
नववा शांत रस मुक्तप्राप्तीसाठी तत्वज्ञानरूपी क्षमाशी संयस्थ अध्यात्मिक मानवी भावनांच्या पलीकडे सर्वश्रेष्ठ मानला जाणारा हा शांत रस हरिवंश वर्णन यामध्ये महर्षी व्यासांनी या रसाचे वर्णन केले आहे ज्ञानेश्वरांचे पसायदान शांत रसाचे सर्वोत्तम उदाहरण
मीना गुडखिंडी यांनी नऊ रसांचे इत्यंभूत वर्णन त्यांची उत्पत्ती परिणाम आदी विशद केले भरत मुनींनी सांगितलेल्या आठ रसांव्यतिरिक्त शांतीरस व भक्तिरस यांबाबत सांगितले शेवटी शांत रसाचे अविष्कार असणाऱ्या पसायदान आणि आपल्या व्याख्यानाचा शेवट केला सरोज कुमार मिठारी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले अजित क्षीरसागर यांनी प्रास्ताविक केले अविनाश जोशी यांनी परिचय करून दिला श्रुती मुळे यांनी आभार मानले
डॉ संजीव गोखले व श्री अविनाश जोशी यांनी या व्याख्यानाचे प्रायोजन केले होते श्रोत्यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली
चौकट: शृंगार रस- रंग सावळा, दैवत विष्णू, रत्न हिरा ,अधिपती शुक्र.
हास्य रस-रंग पांढरा, दैवत प्रथम गण शंकर, रत्न पाचू, अधिपती बुध.
करूण रस -रंग कबरा, दैवत यम, रत्न नीलम, अधिपती शनि.
रौद्ररस – रंग लाल, दैवत रुद्र, रत्न पोवळा ,अधिपती मंगळ.
वीर रस -रंग गौर, दैवत महेंद्र, रत्न माणिक ,अधिपती रवि.
भयानक रस- रंग काळा, दैवत काल, रत्न गोमेद, अधिपती राहू
बीभत्स रस- रंग गडद निळा,
दैवत महाकाल,रत्न वैदूर्य, अधिपती केतू.
अद्भुत रस- रंग पिवळा ,दैवत ब्रह्मा, रत्न पुष्कराज ,अधिपती गुरु.
शांत रस- रंग, दैवत ,रत्न ,अधिपती विरहित.सर्व रसांचा अधिपती.
****


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!