कोथरूड: हाॅटेलची अतिक्रमणे हटवली
कोथरूड येईल तीन हॉटेल्सचे
अनधिकृत बांधकाम पाडले
पुणे – महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाने कोथरूड येथील स्पाईस गार्डन, कोरिएंटल लिफ आणि डेलीहा अशा तीन मोठ्या हॉटेल्सचे बांधकाम आज (शुक्रवारी) पाडले. या कारवाईत काढून टाकण्यात आलेले अनधिकृत बांधकाम सुमारे २५हजार चौरस फुटांचे होते.
ही तीनही हॉटेल्स पौड रोडवरील रामबाग कॉलनीतील प्रसिद्ध हॉटेल्स आहेत. या ठिकाणी महापालिकेने धडक कारवाई केली. बांधकाम विकास विभागाचे कार्यकारी अभियंता बिपिन शिंदे, उप अभियंता श्रीकांत गायकवाड तसेच मुकेश पवार, मनोज मते, सागर शिंदे, गणेश ठोंबरे, ऋषिकेश जगदाळे, राठोड आणि भावेश या अभियंता आणि कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.