निवडणूक निकालावर प्रादेशिक पक्षांचे भवितव्य _ पृथ्वीराज चव्हाण
निवडणूक निकालावर
प्रादेशिक पक्षांचे भवितव्य
_ पृथ्वीराज चव्हाण
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या निकालावर प्रादेशिक पक्षांचे भवितव्य ठरेल, असे मत माजी मुख्य मंत्री, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले .
निवडणुकी नंतर बरेचसे पक्ष काँग्रेस पक्षात विलीन होतील किंवा काँग्रेस बरोबर जातील,असे विधान ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एका इंगर्जी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केले आहे.तसेच पवार यांचा पक्ष काँग्रेस मध्ये विलीन होईल,असे सूचित केले आहे.
याबाबत बोलताना चव्हाण म्हणाले,पवार यांनी मुलाखत दिली तेव्हा मी तिथेच होतो.विलिनी करणा बाबत त्यांचे व्यक्तिगत असावे.ते सहकाऱ्यांशी बोलून निर्णय घेतील.मात्र निवडणूक निकालानंतर दिल्लीत ज्याचे सरकार येईल ,शक्यतो त्या बाजूने छोटे किंवा प्रादेशिक पक्ष जातील.
पक्ष फोडण्यासाठी पैशाचा वापर, अर्थ व्यवस्था हाताळण्यात आलेले अपयश,भ्रष्टाचार,महागाई यामुळे देशभर असंतोष असून मोदी यांच्या विरोधी सुप्त लाट आहे,असे मत चव्हाण यांनी व्यक्त केले.