लंडन वरून केवळ मतदानासाठी


 

लंडनवरून येऊन तरुण मतदाराने

बजावला मतदानाचा हक्क

पुणे, दि. १३: जिल्ह्यात आज मावळ, पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचे मतदान झाले. विविध मतदान केंद्रावर परदेशातून खास मतदान करण्यासाठी आलेले मतदारदेखील पहावयास मिळत होते. डॉ. किरण तुळसे यांनी लंडनवरून येवून आपला मतदानाचा हक्क बजावून स्थानिक नागरिकांसमोर मतदानाचा हक्क बजावण्याचे एक आदर्श उदाहरण दिले.

Advertisement

पिंपरी चिंचवड मधील डॉ. किरण यांनी सोमवारी दुपारी आपल्या आई वडिलांसह थेरगाव येथील एम. एम. हायस्कूलमध्ये मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावले. डॉ. किरण तुळसे हे मागील सहा वर्षांपासून लंडन येथे स्थायिक आहेत.

आई, वडिलांचा सामाजिक कार्याचा आदर्श डोळ्यापुढे ठेवत नोकरी करून कौटुंबिक जबाबदारी पार पाडत असताना मतदान करणे ही देखील आपली राष्ट्रीय जबाबदारी आहे, हा विचार त्यांना मनात सतत येत होता. प्रत्येकाच्या एकेका मताने लोकशाही बळकट होत असते. त्यामुळे मी आवर्जून लंडन येथून फक्त या लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आलो आहे, असे डॉ. तुळसे यांनी सांगितले.
००००


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!
21:24