पुण्यात १७ तारखेपर्यंत पाऊस
पुण्यात १७ तारखेपर्यंत पाऊस
पुणे – शहर आणि परिसरात १७ तारखेपर्यंत संध्याकाळच्या सुमारास पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय वेधशाळा आणि हवामान विषयी अभ्यास करणाऱ्या खाजगी संस्थांनी व्यक्त केला आहे. आज (बुधवारी) दुपारी ३.३० च्या सुमारास पाऊस पडेल.
गेले ४ दिवस पुण्यात संध्याकाळच्या वेळेस ढगाळ हवामान राहाते आणि अधुनमधून पाऊस पडतो. ही स्थिती १७ तारखेपर्यंत राहील. त्यानंतर पुन्हा हवामान कोरडे राहील, असे वेधशाळेने म्हटले आहे.
दुपारी कडक उन्ह आणि संध्याकाळी पावसाळी हवा असे विषम हवामान असल्याने, यंदा बाजारपेठेत शीतपेयांची विक्री घटली आहे. मे महिन्याची सुट्टी असूनही भेळ आणि तत्सम खाद्यपदार्थांच्या विक्रेत्यांच्या व्यवसायावरही परिणाम झाला आहे.