जागतिक हिमोफिलिया दिनानिमित्त शिबीर
जागतिक हिमोफिलिया दिनानिमित्त शिबीर संपन्न
हिमोफिलिया रुग्णांना चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न करु
– जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपेसातारा
:- हिमॅटॉलॉजी विभाग स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात गेल्या १० वर्षांपासून येथे कार्यरत आहे. हिमोफिलिया ग्रस्त अनेक रुग्णांना सेवा देण्याच काम करत आहोत आणि इथून पुढेही योग्य ते बदल करुन आपण जास्तीत जास्त चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न करु, असे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्स डॉ. युवराज करपे यांनी केले.
जागतिक हिमोफिलिया दिनानिमित्त शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यिचिकित्सक डॉ. सुभाष कदम, हिमॅटॉलॉजी विभागाच्या श्रीम. अश्विनी जाधव, शितल पोळ, नितिन कांबळे उपस्थित होते.
Advertisementजिल्हा रुग्णालय, सातारा रुग्णांना सर्व आरोग्य सुविधा मोफत देत आहे. हिमॅटॉलॉजी विभाग देखील हिमोफिलिया ग्रस्त रुग्णांना मोफत फॅक्टर देण्याची सुविधा गेले १० वर्षांपासून देत आहे. Factor ची कमतरता भासल्यास आपण वेगवेगळया लोकोपयोगी फंडांतून Factors ची उपलब्धता करुन घेतो. रुग्णालयात जसे गरीब परीस्थितीत रुग्ण देखील येतातआणि येथील सुविधांचा लाभ घेतात, असेही डॉ. करपे यांनी शिबीरा प्रसंगी सांगितले.
Snnibitor म्हणजे Hemophelia च्या विरोधात Antibodies तयार होतात. त्यासाठी दर ६ महिन्यांनी या रुग्णांना ही टेस्ट करावी लागते. सदर ची टेस्ट करण्यासाठी रुग्णांना पुणे किंवा मुंबई ला जावे लागते किंवा बरेच पैसे मोजावे लागतात. या शिबीरामध्ये ही टेस्ट मोफत करण्यात आली. याचा २५ रुग्णांनी लाभ घेतला.
000