क्रीडा

तायक्वांदोमध्ये प्राविण्य प्राप्त खेळाडूंसाठी संध
सातारा (जिमाका) : बॉईज स्पोर्ट्स कंपनी, आर्टिलरी सेंटर, नाशिक रोड येथे तायक्वांदो खेळामध्ये प्राविण्य प्राप्त तरुण होतकरु खेळाडूंसाठी प्रवेश निवड चाचणी 17 मे ते 19 मे 2024 या कालावधीमध्ये आयोजित केलेली आहे. तरी ज्या मुलांचे वय 8 ते १४ ह्या वयोगट मध्ये आहे व जिल्हा स्तरावरील खेळांमध्ये विशेष प्राविण्य प्राप्त आहे अशा सर्व खेळाडूंनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन मेजर आनंद पाथरकर, सेना मेडल (नि.) जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी , यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी फोन नंबर 7005053882 (तायक्वांदो प्रशिक्षक) वर संपर्क साधावा.
00000