ब्लड रिपोर्ट बदलल्या प्रकरणी दोन डॉकटर अटकेत
ब्लड रिपोर्ट बदलल्या प्रकरणी दोन डॉकटर अटकेत
पुणे
कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा ब्लड रिपोर्ट बदलल्या प्रकरणी ससून रुग्णालयातील फॉरेन्सीक विभागाचे प्रमुख डॉ अजय तावरे आणि डॉ श्रीहरी हर्सूल या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी रात्री उशीरा अटक केलीय. ड्रग तस्कर ललीत पाटील प्रकरणात देखील ससून रुणालयातील डॉक्टरांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता दोन डॉक्टरांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्यामुळे ससून रुग्णालयाच्या भ्रष्टाचाराने बरबरलेल्या प्रशासनावर अनेक सवाल उपस्थित होवू लागले आहेत .