डॉक्टर प्रमोद चौधरी यांना पुरस्कार जाहीर
देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण
शिक्षणोत्तेजक संस्थेचा
ऋग्वेद भूषण पुरस्कार उद्योजक
डॉक्टर प्रमोद चौधरी यांना जाहीर
पुणे- शताब्दी वर्ष साजरे करणाऱ्या देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेचा ऋग्वेद भूषण पुरस्कार सुप्रसिद्ध उद्योजक, प्राज इंडस्ट्रीज चे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष डॉक्टर प्रमोद चौधरी यांना जाहीर झाला आहे.
ऋग्वेद भूषण पुरस्कार आणि अन्य पुरस्कारांचे वितरण समारंभ शनिवार दिनांक ८ जून २०२४ रोजी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सदाशिव पेठेतील भावे प्राथमिक शाळेच्या सभागृहात होईल. पुरस्कारार्थींची निवड संस्थेच्या विश्वस्त मंडळाने केली आहे. ऋग्वेद भूषण हा मानाचा पुरस्कार डॉक्टर चौधरी यांना सिंबायोसिस चे संस्थापक, अध्यक्ष शां.ब.मुजुमदार यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम १०हजार१रूपये, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे आहे.
तसेच सवाई गंधर्व यांच्या कन्या स्व.प्रमिलाताई देशपांडे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा स्वर्गीय प्रमिलाताई देशपांडे पुरस्कार श्री.विराज जोशी यांना जाहीर झाला असून संस्थेचे संस्थापक कै.आबासाहेब मुजुमदार स्मरणार्थ दिला जाणारा पुरस्कार कऱ्हाडे ब्राह्मण संघाला जाहीर झाला आहे. याखेरीज ऋग्वेद पुरस्कार वेदमूर्ती श्री.माधव परांजपे, विज्ञान संशोधक अभ्यास पुरस्कार डॉक्टर प्रकाश वडगावकर, आदर्श स्थापत्य शास्त्रज्ञ पुरस्कार श्री.दिपक मोडक, इतिहास/साहित्य संशोधन पुरस्कार डॉक्टर अजित आपटे, अभिनव पुरस्कार श्री.संदीप अवधानी आणि सर्वोदय पुरस्कार श्री.रविंद्र जोशी यांना जाहीर झाला आहे. या सर्व पुरस्कारांचे वितरण दिनांक ८ जून २०२४ रोजी होणाऱ्या समारंभातच होईल.