ज्येष्ठ पत्रकार जयंत माईणकर यांना अत्रे पुरस्कार जाहीर


अत्रे प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय साहित्य,पत्रकारिता व कलाकार पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ पत्रकार जयंत माईणकर सन्मानित होणार

Advertisement

सासवड :- आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान दरवर्षी आचार्य प्र. के.अत्रे यांच्या १३ जून या स्मृतिदिनी “आचार्य अत्रे पुरस्कार” सोहळा कार्यक्रम घेत असते. आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, पुरंदर व महाराष्ट्र साहित्य परिषद, सासवड शाखा यांच्या संयुक्त सहकार्याने ५५ वा स्मृतिदिन साजरा, करीत आहे. या दिवशी आचार्य प्र. के. अत्रे यांच्या स्मृति रसिकांसमोर सतत राहाव्यात या उद्देशाने आचार्य अत्रे ‘साहित्य’, आचार्य अत्रे ‘पत्रकारिता’ व आचार्य अत्रे ‘कलाकार’ पुरस्कार दिले जातात. या पुरस्काराचे हे ३४ वे वर्ष आहे.
या निमित्ताने दिल्या जाणाऱ्या आचार्य अत्रे पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून यावर्षीचा आचार्य अत्रे “साहित्य पुरस्कार” मराठी साहित्यातील ज्येष्ठ लेखिका डॉ. संगीता बर्वे यांना जाहीर झाला आहे. आचार्य अत्रे “पत्रकारिता पुरस्कार” ज्येष्ठ पत्रकार” श्री. जयंत माईणकर यांना तर आचार्य अत्रे “कलाकार पुरस्कार” ज्येष्ठ दिग्दर्शक केदार शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे.
पुरस्कार वितरण कार्यक्रम आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष एड.बाबुराव कानडे यांच्या शुभहस्ते १३ जून २०२४ रोजी “डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन” सासवड येथे दुपारी ४ वाजता संपन्न होणार असून कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भारती सहकारी बँकेचे चेअरमन सी.ए.भाऊसाहेब कड उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.विजय कोलते यांनी दिली. पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन म.सा.प.सासवड शाखेचे अध्यक्ष आण्णासाहेब खाडे यांनी केले आहे. याप्रसंगी प्रतिष्ठानचे सचिव शांताराम पोमण,बंडूकाका जगताप, ऍडदिलीप निरगुडे , वसंतराव ताकवले,डॉ.राजेश दळवी, कुंडलिक मेमाणे, शिवाजी घोगरे व पदाधिकारी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!