साप्ताहिक राशिभविष्य
साप्ताहिक राशिभविष्य
दि. १५ जुलै २०२४ ते दि. २१ जुलै २०२४
आगामी सप्ताहात, बुधवार, दि. १७ जुलै रोजी आषाढी एकादशी व मोहरम आहे, शुक्रवार, दि. १९ जुलै रोजी प्रदोष व महाराष्ट्रीय बेंदूर आहे तर रविवार, दि. २१ जुलै रोजी गुरुपौर्णिमा व व्यासपूजा आहे. आगामी सप्ताहात आज सोमवार, दि. १५ जुलै उत्तम दिवस आहे, मंगळवार, दि. १६ जुलै विशाखा वर्ज्य दिवस व बुधवार, दि. १७ जुलै करिदिन वर्ज्य दिवस , गुरुवार. दि. १८ जुलै ज्येष्ठ वर्ज्य दिवस , शुक्रवार, दि. १९ जुलै चांगला दिवस, शनिवार, दि. २० जुलै वैधृती वर्ज्य दिवस तर रविवार, दि. २१ जुलै चांगला दिवस याप्रमाणे दिवस असणार आहेत. आगामी सप्ताहात चंद्राचे तुला, वृश्चिक, धनु व मकर या राशीतून भ्रमण होणार आहे. आगामी सप्ताह हा सिंह, कन्या, तुला व कुंभ या राशींच्या व्यक्तींना विशेष अनुकूल आहे.
मेष : चिंता जाणवतील.
आगामी सप्ताहाची सुरुवात काहीप्रमाणात उत्साहवर्धक वाटेल मात्र आगामी सप्ताहात आपणाला विनाकारण काही चिंता लागून राहण्याची शक्यता आहे. आगामी सप्ताहात आपण महत्त्वाच्या कामाचे नियोजन करण्याचे टाळावे. सप्ताहाच्या मध्ये एकदोन दिवस आपली दैनंदिन कामे रखडणार आहेत. मानसिक स्वास्थ्य कमी राहील. आपल्यावर कसलेतरी भावनिक दडपण राहील. आगामी सप्ताहात आपण प्रवासात व वाहने चालविताना विहेश काळजी घ्यावी तसेच आपण जर वर्षा विहारासाठी जाणार असाल तर आपण विशेष काळजी घ्यावी. अतिउत्साहीपणा टाळावा. सप्ताहाच्या शेवटी आपले मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल.
अनु. दि. १५,१६,२०,२१
वृषभ : मानसिक अस्वस्थता राहील.
आगामी सप्ताहाची सुरुवात आपल्याला काहीशी खर्चिक असणार आहे. आपले मनोबल कमी राहील. आपल्याला मानसिक अस्वास्थतेचा सामना करावा लागणार आहे. आपली दैनंदिन कामे विलंबाने होणार आहेत. मानसिक अस्वस्थतेमुळे आपल्याला आरोग्याच्या काही तक्रारीदेखील जाणवणार आहेत. आपण इतर कोणत्याही गोष्टींचा विचार न करता आपण आपल्या कामावर आपले लक्ष केंद्रित करावे. सप्ताहाच्या मध्ये एक दोन दिवस आपले मनोबल बरे राहील. आगामी सप्ताहाच्या शेवटी आपण प्रवास करण्याचे कटाक्षाने टाळावे. आगामी सप्ताहात आपल्याला काही अनवश्यक खर्च संभवतात. काळजी घ्यावी. आपण आपले मानसिक आरोग्य जपावे..
अनु. दि. १७,१८,२१
मिथुन : मनोबल कमी राहील .
आगामी सप्ताहात आपले मनोबल कमी असणार आहे. आगामी सप्ताहाच्या सुरुवातीला आपले व्यवसायातील अंदाज अचूक ठरतील. आपण आपली कामे मार्गी लावू शकाल. आपल्याला जाणवत असणारी अस्वस्थता सप्ताहाच्या शेवटी कमी होईल. आगामी सप्ताहात आपण कोणत्याहीप्रकारचे आर्थिक धाडस करण्याचे टाळावे. प्रवास करताना व वाहने चालविताना आपण विशेष काळजी घ्यावी. आगामी सप्ताहात काहींना हितशत्रू व विरोधक यांचा त्रास जाणवण्याची शक्यता आहे. अनावश्यक कामात आपला वेळ वाया जाईल. आगामी सप्ताहात काहींचा धार्मिक कार्यात सहभाग राहील. तसेच काहींची अध्यात्मिक प्रगती होईल. आगामी सप्ताहात शक्यतो कोणत्याही महत्त्वाच्या कामाचे नियोजन करण्याचे टाळावे.
अनु. दि. १९,२०
कर्क : सप्ताहाची सुरुवात अनुकूल
आगामी सप्ताहाची सुरुवात ही उत्साहाची असणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला आपण आपली महत्त्वाची कामे मार्गी लावू शकणार आहात. आगामी सप्ताहाच्या पूर्वार्धात आपल्याला आर्थिक लाभ होणार आहेत तसेच सप्ताहाचा पूर्वार्ध हा आपल्याला महत्त्वाच्या गाठीभेटी घेण्यासाठी अनुकूल आहे. आपण आपले सहकारी, मित्रमैत्रिणी यांच्याशी सुसंवाद साधणार आहात. आगामी सप्ताहाच्या उत्तरार्धात मात्र आपल्याला मानसिक अस्वस्थतेचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या उत्तरार्धात आपल्याला काही अनपेक्षित अडचणी जाणवणार आहेत. आगामी सप्ताहात जर आपणाला प्रवासाचे नियोजन करायचे असेल तर ते शक्यतो सप्ताहाच्या पूर्वार्धात करावे. सप्ताहाच्या शेवटी आपले काही अनावश्यक खर्च होतील. आपला मनोरंजनाकडे कल राहील.
अनु. दि. १५ ते १८
सिंह : कार्यक्षेत्र वाढेल.
आगामी सप्ताहात आपला उत्साह व उमेद विशेष असणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रात नवीन संधी लाभणार आहे. तुम्हाला तुमच्या मनासारखे काम करायला मिळेल व तुमचे कार्यक्षेत्र अधिक व्यापक होईल. या सप्ताहात तुमचेमनोबल वाढविणाऱ्या काही घटना घडतील. नातेवाईकांचे आपल्याला सहकार्य लाभेल. आपल्याला व्यवसाय किंवा नोकरीनिमित्त प्रवास करावा लागेल. तसेच आगामी सप्ताहात तुम्ही छोट्या सहलींचे नियोजन करणार आहात. आपल्या कुटुंबासमवेत आपण आपला वेळ आनंदात घालवणार आहात. प्रवास सुखकर होणार आहेत. आगामी सप्ताहात आपल्याला आपली मते इतरांना पटवून देता येणार आहेत. सप्ताहाच्या शेवटी महत्त्वाचे व्यवहार तसेच महत्त्वाच्या गाठीभेटी यशस्वी होणार आहेत.
अनु. दि. १५ ते २०
कन्या : अनुकूलता लाभेल.
आगामी संपूर्ण सप्ताह आपणाला अनेकदृष्टीने अनुकूल असणार आहे. आपले मनोबल व आपला आत्मविश्वास उत्तम असणार आहे. आगामी सप्ताहात आपले आरोग्य उत्तम राहील. तुमच्या विचारांचा व तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वत्र प्रभाव असणार आहे. आगामी सप्ताहात आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रात काही अनुकूल बदल करता येणार आहेत. या सप्ताहात आपणाला चंद्राची भ्रमणे अनुकूल असणार आहेत, त्यामुळे आगामी संपूर्ण सप्ताह हा आपल्याला विशेष अनुकूल असणार आहे. आगामी संपूर्ण सप्ताहात आपण विशेष उमेदीने कार्यरत राहणार आहेत. आगामी संपूर्ण सप्ताह आपणाला प्रवासाकरिता अनुकूल असणार आहे.
अनु. दि. १५ ते २१
तुला : उत्साही रहाल.
आगामी सप्ताह हा आपणाला अनेकदृष्टीने अनुकूल असणार आहे. आगामी सप्ताहात आपल्याला मानसिक स्वास्थ्य लाभणार आहे. त्याचबरोबर शारीरिक स्वास्थ्यदेखील लाभणार आहे. आपले आरोग्य उत्तम राहील. येत्या या सप्ताहात आपणाला आपली अनेक महत्त्वाची कामे पूर्ण करता येणार आहेत. आगामी सप्ताहात आपले मनोबल व आत्मविश्वास वाढविणाऱ्या तसेच आपल्याला मानसिक प्रसन्नता देणाऱ्या घटना घडणार आहेत. आर्थिक कामासाठी तसेच व्यवसायातील जुनी येणी वसूल करण्यासाठी आगामी सप्ताह आपणाला विशेष अनुकूल असणार आहे. आगामी सप्ताहात आपण आपली दैनंदिन कामे विनासायास मार्गी लावू शकणार आहात. प्रवासासाठी तसेच महत्त्वाच्या गाठीभेटी घेण्यासाठी आपल्याला आगामी संपूर्ण सप्ताह अनुकूल असणार आहे.
अनु. दि. १५ ते २१
वृश्चिक : खर्च वाढतील.
आगामी सप्ताहाची सुरुवात ही आपल्याला खर्चिक जाण्याची शक्यता आहे. आगामी सप्ताहात आपला वेळ काही अनावश्यक कामात वाया जाईल. आपल्यावर मानसिक दबाव राहण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला आपण कोणत्याही महत्त्वाच्या कामाचे नियोजन करण्याचे टाळावे. आगामी सप्ताहात आपल्याला विषेशतः सप्ताहाच्या पूर्वार्धात आपल्या मनाविरुद्ध एखाद्या घटनेला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. आपण आपले आरोग्य जपावे. आगामी सप्ताहाच्या उत्तरार्धात मात्र आपले मनोबल वाढेल. आपली सप्ताहाच्या सुरुवातीला रखडलेली सर्व कामे आपण सप्ताहाच्या शेवटी मार्गी लावू शकणार आहात. प्रवासाचे नियोजन शक्यतो सप्ताहाच्या उत्तरार्धात करावे.
अनु. दि. १७ ते २१
धनु : मनोबल कमी राहील.
आगामी सप्ताहाची सुरुवात उत्साहाची झाली तरी आगामी सप्ताहात पुढे एक दोन दिवस आपल्याला निराशाजनक वाटणार आहे. आपले मनोबल कमी राहील. आपल्याला आत्मविश्वासाची कमतरता जाणवेल. आपल्यावर कसला तरी मानसिक ताण राहील, कसलेतरी भावनिक दडपण राहील. सप्ताहाच्या पूर्वार्धात आपण कोणत्याही महत्त्वाच्या कामाचे नियोजन करण्याचे टाळावे. आर्थिक लाभाच्यादृष्टीने मात्र सप्ताहाची सुरुवात आपणाला अनुकूल असणार आहे. आगामी सप्ताहाच्या सुरुवातीला काहींना अचानक धनलाभ संभवतो. सप्ताहाच्या उत्तरार्धात मात्र आपले मनोबल वाढेल. आपल्याला स्वास्थ्य व समाधान लाभेल. सप्ताहाच्या उत्तरार्धात काहींना अनपेक्षितपणे प्रवास संभवतो. सप्ताहाच्या शेवटी आपला उत्साह व उमेद वाढणार आहे.
अनु.दि. १५,१६,१९,२०,२१
मकर : सप्ताहाच्या उत्तरार्धात प्रतिकुलता जाणवेल.
आगामी सप्ताहाच्या उत्तरार्धात आपल्याला प्रतिकुलतेचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. आगामी सप्ताहात आपण प्रवास करण्याचे टाळावे तसेच वाहने चालवितानाही विशेष काळजी घ्यावी. सप्ताहाच्या सुरुवातीलाच काहींना एखादी मनस्तापदायक घटना संभवते. आपले मनोबल कमी राहील. आगामी सप्ताहात आपली दैनंदिन कामे विलंबाने होणार आहेत. आपल्याला काही अडचणी जाणवणार आहेत. आगामी सप्ताहात आपल्याला आरोग्याच्या किरकोळ तक्रारी राहणार आहेत. सर्दी, पडसे, ताप यासारखे विकार जाणवतील. आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी आपले मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील.
अनु. दि. १५,१६,१७,१८,२१
कुंभ : दैनंदिन कामात सुयश
आगामी सप्ताह हा आपणाला अनेक बाबतीत अनुकूल असणार आहे. येणाऱ्या या सप्ताहातील शनिवारपर्यंतची चंद्राची भ्रमणे आपल्याला विशेष अनुकूल असणार आहेत. आगामी सप्ताहात आपण आपली दैनंदिन कामे विनासायास मार्गी लावणार आहात. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढणार आहे. तुम्ही आपली मते इतराना पटवून देणार आहात. तुम्हाला महत्त्वाची कामे करण्यासाठी अनुकूलता असणार आहे व त्याचा आपण फायदा करून घ्यावा. आगामी सप्ताहात आपल्याला सार्वजनिक व सामाजिक कामात सहभागी होता येईल. तुम्हाला मानसन्मान लाभेल. नोकरीमध्ये तुम्ही करत असलेल्या कामाची उचित दखल घेतली जाईल. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला अपेक्षित असणारी सुसंधी लाभेल.
अनु. दि. १५ ते २०
मीन : सप्ताहाचा उत्तरार्ध अनुकूल
आगामी सप्ताहाच्या उत्तरार्धात आपले आरोग्य उत्तम राहील तसेच आपण विशेष उमेदीने व उत्साहाने कार्यरत रहाणार आहात. मात्र सप्ताहाच्या सुरुवातीला मात्र आपल्याला मानसिक अस्वास्थ्य राहणार आहे. आपल्याला कसलीतरी काळजी लागून राहील. आपल्यावर एखादे भावनिक दडपण राहील. दैनंदिन कामांमध्ये आपण विलंब अनुभवणार आहात. आगामी सप्ताहाच्या पूर्वार्धात आपण प्रवासाचे नियोजन टाळावे तसेच आगामी सप्ताहात आपण कोणत्याही बाबतीत अधिक विचार करण्याचे टाळावे. सप्ताहाच्या उत्तरार्धात आपण आपली रखडलेली कामे मार्गी लावू शकणार आहात. आपल्यावर असणारा ताण कमी होईल.
अनु. दि. १७ ते २१
ज्योतिष विशारद सौ. स्वप्ना अवसरे – पवार, ( B.S.L, LL.M.)
गार्गी ज्योतिषालय, संभाजीनगर, सातारा- ९८२२३०३०५४