पूरग्रस्तांचा मालमत्ता कर माफ करा
पूरग्रस्तांचा मालमत्ता कर माफ करा
हरिदास चरवड यांची मागणी
पुणे – प्रचंड पाऊस आणि पूर यामुळे नुकसान झालेल्या नागरिकांचा यंदाचा मालमत्ता कर माफ करावा, अशी मागणी भाजपचे शहर उपाध्यक्ष, माजी नगरसेवक हरिदास चरवड यांनी महापालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे.
उच्चांकी पावसाने शहराला दोन दिवस झोडपून काढले. मुठा नदीला आलेल्या पुराने सिंहगड रस्त्यावरील सखल भागात रहाणाऱ्या नागरिकांच्या जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले. दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे नुकसान झाले. दुकानदारांनाही मोठा फटका बसला. नुकतेच शैक्षणिक वर्ष चालू झाले. त्यामुळे शिक्षणावरील खर्चाचा बोजा पालकांना पडला. त्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीची भर पडल्याने आर्थिक विवंचना निर्माण झाली आहे, असे हरिदास चरवड यांनी निवेदनात म्हटले आहे.
पाऊस आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे चालू आहेत. त्यातून नुकसानभरपाई मिळेल. पण, या निवासी करदात्यांना आणि छोट्या दुकानदारांना चालू वर्षाचा मिळकत कर माफ करावा, अशी मागणी चरवड यांनी निवेदनात केली आहे.