सांस्कृतिक कार्य विभागामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन
प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन
जिल्हा मध्यवर्ती बँक सभागृह,सातारा(डी.सी. सी. हॉल ) या ठिकाणी रंगणार भारत पर्व
सातारा 24: सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने भारत पर्व या मराठी हिंदी देशभक्तीपर गीत मंत्र त्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे आयोजन येथे रविवारी 26 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता मध्यवर्ती बँक सभागृह,सातारा(डी.सी. सी. हॉल ) या ठिकाणी होणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना मा. सांस्कृतिक कार्यमंत्री .ॲड आशिष शेलार यांची असून, श्री विकास खारगे मा मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा अपर मुख्य सचिव सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमांमध्ये भार्गव कांबळे , प्रदीप जिरगे , मंदार कदम शिवाजी सुतार , यशपाल देवकुळे वैदही जाधव, वेदर सोनुले असे नामवंत गायक गायिका सहभागी होणार असून सतीश कुलकर्णी यांच्या निवेदनाखाली हा कार्यक्रम संपन्न होणार असून या कार्यक्रमाच्या साठी संगीत संयोजन महेश सोनुले व वेदा सोनुले यांनी केले आहे तर नृत्याविष्कार चंद्रकांत पाटील आणि समूह यांचा आहे या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्री. विभीषण चवरे यांनी केले आहे.