आजच्या ताज्या बातम्या (25 जानेवारी)
गळफास घेऊन एकाची आत्महत्या
सातारा : गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 29 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अजय आनंदराव जाधव रा. आरे, ता. सातारा याने राहत्या घरी नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार निकम करीत आहेत.
अपघात प्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा
सातारा : अपघातात एका वृद्धास जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालका विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 26 रोजी संध्याकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास वर्ये ते मोळाचा ओढा रस्त्यावर रघुनाथ शंकर जाधव रा. सैदापूर, ता. सातारा या वृद्धास पाठीमागून धडक देऊन जखमी केल्याप्रकरणी दुचाकी क्र. एम एच 11 सीए 3906 वरील चालक नमाजुल शेख रा. कोंडवे, ता. सातारा याच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार वायदंडे करीत आहेत.
*****
मारहाण प्रकरणी दोन जणांवर गुन्हा
सातारा : दोघांना मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 27 रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास आसगाव ता. सातारा येथे शिवाजी चंद्रकांत शिंदे आणि चंद्रकांत शिंदे दोघेही रा. आसगाव ता. सातारा यांना तेथीलच हर्षल चंद्रकांत शिंदे आणि संगीता शिंदे या दोघांनी जुन्या वादाच्या कारणातून मारहाण करून जखमी केले आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार बोराटे करीत आहेत.
****
सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील जुगार अड्ड्यावर छापा; नऊ जणांवर कारवाई
सातारा : सातारा शहर पोलिसांनी सिव्हिल हॉस्पिटल परिसरात सुरू असणाऱ्या जुगार अड्ड्यावर छापा मारून नऊ जणांवर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 29 रोजी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सातारा शहरातील सिव्हिल हॉस्पिटल परिसरात असणाऱ्या भवानी मटन शॉप जवळच्या पत्र्याच्या शेडच्या आडोशास जुगार प्रकरणी जयदीप पोपटराव यादव रा. वाढे ता. सातारा, अभिजीत अशोक चौगुले रा. मंगळवार पेठ सातारा, अभय प्रभाकर मांडोळे रा. सदर बाजार सातारा, धनंजय शिवाजी भोंडवे रा. सदर बाजार सातारा, भारत पूनमचंद सोलंकी रा. सदर बाजार सातारा, अनिल दशरथ खंडाळे रा. शनिवार पेठ सातारा, करण अनिल लादे रा. सदर बाजार सातारा, केदार मुरलीधर नलवडे रा. खेड सातारा आणि आकाश हनुमंत पवार रा. सैदापूर तालुका सातारा यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 53 हजार 270 रुपये किंमतीचे 6 मोबाईल, रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
****
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी
सातारा : सातारा शहर परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकींची चोरी केल्याच्या फिर्यादी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये दाखल करण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 23 ते 24 दरम्यान सोमनाथ आनंद धोत्रे रा. करंजे पेठ सातारा यांची घरासमोर रस्त्याच्या कडेला पार्क केलेली दुचाकी क्रमांक एमएच 11 एटी 9115 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार सणस करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत, सिव्हिल हॉस्पिटल समोरील पार्किंग मधून इफराज अहमद वारुसे रा. रामापुर, ता. पाटण यांची दुचाकी क्र. एमएच 50 आर 2489 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. अधिक तपास पोलीस नाईक भोंडवे करीत आहेत.
***
शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी एकावर गुन्हा
सातारा : शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 25 रोजी रात्री साडेदहा ते अकराच्या दरम्यान कोयना हौसिंग सोसायटी, सदर बाजार, सातारा येथील कण्हेर उजवा कालव्याची एक बाजू जेसीबीने फोडून त्यामध्ये सांडपाण्याची पाईप सोडून पुन्हा कालवा मुजवून शासकीय मालमत्तेचे सुमारे दीड लाखांचे नुकसान करून कालव्याला धोका निर्माण करीत कालव्याच्या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी शेखर वैंकु राठोड रा. कोयना हौसिंग सोसायटी रा. सदर बाजार, सातारा यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस नाईक बोराटे करीत आहेत.