शनिवारी नरहर कुरुंदकर स्मृती व्याख्यान


साताऱ्यात शनिवारी
नरहर कुरुंदकर स्मृती व्याख्यान
सातारा – महाराष्ट्रातील ख्यातकीर्त विचारवंत स्मृतीशेष नरहर कुरुंदकर यांच्या स्मरणार्थ येत्या शनिवारी ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता नगरवाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे,अशी माहिती, निमंत्रक  विश्वास दांडेकर व किशोर बेडकिहाळ यांनी दिली.
या विशेष व्याख्यानात दैनिक लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर ‘ नरहर कुरुंदकर व महाराष्ट्रातील समाज प्रबोधन चळवळ ‘ या विषयावर बोलणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन नरहर कुरुंदकर विचारमंचच्या वतीने करण्यात आली आहे.
@@@


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!