एसीबी आपल्या दारी
लाचखोरीवर आळा बसण्यासाठी एसीबी आपल्या दारी
सातारा / प्रतिनिधी
लाचुलचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) प्रभावी कारवाया होऊन लाचखोरीवर आळा बसण्यासाठी एसीबी आपल्या दारी मोहिम सुरू करण्यात आली आहे.
लाचेची मागणी झाल्यास नागरिकांना तक्रार करण्यासाठी एसीबीच्या सातारा कार्यालयात यावे लागते. त्यामाळे अनेकदा साताऱ्यापासून लांबच्या व दुर्गम भागातील नागरिक तक्रार देण्यास टाळाटाळ करतात. नागरिकांची ही गैरसोय टाळण्यासाठी ही मोहिम सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये दूर व दुर्गम भागातील नागरिकांनी तक्रारीबाबत संपर्क केल्यास एसीबीचे अधिकारी नागरिक आहे त्या ठिकाणी जाऊन तक्रार घेणार आहेत. त्यासाठी लाचेची मागणी झाल्यास नागरिकांनी एसीबीच्या १०६४ या टोल फ्रि क्रमांकावर किंवा ९५९४५३११०० तसेच ९७६३४०८६०० या मोबाईल क्रमांकावर किंवा ०२१६२-२३८१३९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन उपअधिक्षक राजेश वाघमारे यांनी केले आहे. तक्रारदाराचे नाव गोपनिय ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी लाचेची मागणी झाल्यास तातडीने तक्रार करावी असेही त्यांनी म्हटले आहे.
.