राशिभविष्य


आजचा दिवस

शके १९४६, क्रोधीनाम संवत्सर,फाल्गुन कृष्ण त्रयोदशी, गुरुवार, दि. २७ मार्च २०२५, चंद्र – कुंभ राशीत, नक्षत्र – शततारका, सुर्योदय- सकाळी ०६ वा. ३८ मि. , सुर्यास्त- सायं. १८ वा. ५० मि.

नमस्कार आज चंद्र कुंभ राशीत रहाणार आहे. आजचा दिवस त्रयोदशी वर्ज्य दिवस आहे. आज चंद्र – गुरु केंद्रयोग होत आहे. आजचा दिवस मेष वृषभ, मिथुन, सिंह, तुला, वृश्चिक, धनु, मकर व कुंभ या राशींना अनुकूल तर कर्क, कन्या व मीन या राशींना प्रतिकूल जाईल.

दैनंदिन राशिभविष्य

मेष : अनेक बाबतीत अनुकूलता लाभणार आहे. अपेक्षित गाठीभेटी पडतील. जिद्दीने कार्यरत राहणार आहात. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. प्रियजनांचा सहवास लाभणार आहे.

वृषभ : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. सार्वजनिक क्षेत्रात उत्साही राहाल. तुमचा इतरांवर प्रभाव वाढेल. आनंदी व आशावादीपणे दिवस जाणार आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल.

मिथुन : नव्या उमेदीने कार्यरत राहाल. उत्साहवर्धक घटना घडतील. दैनंदिन कामात सुयश लाभेल. गेले दोन दिवस असणारी अस्वस्थता आता संपणार आहे. कामे मार्गी लागतील.

कर्क : काहींना कामाचा ताण जाणवणार आहे. एखादी चिंता लागून राहील. तुम्ही आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल. वादविवाद टाळावेत. प्रतिकूलता जाणवेल.

सिंह : खर्चाचे प्रमाण कमी होईल. तुमचे मन आनंदी राहील. मानसिक प्रसन्नता देणार्‍या काही घटना घडतील. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

Advertisement

कन्या : आजचा तुमचा दिवस आराम करण्यात जाणार आहे. खर्च वाढणार आहेत. तुमचे मनोबल कमी राहणार आहे. आर्थिक कामे आज नकोत. अस्वस्थता राहील.

तुळ : प्रियजनांसाठी वेळ देवू शकणार आहात. उत्साही राहणार आहात. काहींना विविध लाभ होतील. मित्रमैत्रिणींबरोबर गाठीभेटी पडतील. नवीन परिचय होतील. नवे स्नेहसंबंध जुळतील.

वृश्‍चिक : मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. मनोबल उत्तम राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. उत्साहवर्धक घटना घडणार आहे. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

धनु : चिकाटी वाढेल. प्रवास होणार आहेत. मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. चिकाटीने कार्यरत राहाल. नातेवाईकांच्या गाठीभेटी पडतील. प्रवास होतील.

मकर : कौटुंबिक जीवनात आनंददायी घटना घडणार आहे. तुमचा प्रभाव वाढेल. मनोबल उत्तम राहील. काहींना गुप्त वार्ता समजतील. प्रवास सुखकर होतील. सौख्य व समाधान लाभेल.

कुंभ : उत्साह वाढणार आहे. आनंदी राहणार आहात. दैनंदिन कामे विनासायास होतील. वैवाहिक सौख्य लाभेल. अनेकांबरोबर सुसंवाद साधाल. काहींना अनपेक्षित प्रवास संभवतो.

मीन : आज काहींचा कल आराम करण्याकडे असणार आहे. मनोरंजनाकरिता खर्च कराल. प्रवासात व वाहने चालवताना दक्षता हवी. कौटुंबिक मतभेद संभवतात. खर्च वाढतील.

आज गुरुवार, आज दुपारी १.३० ते ३ यावेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.

जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय, संभाजीनगर, सातारा- 982230305


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!