आजचा दिवस: राशिभविष्य
आजचा दिवस
शके १९४७, विश्वावसुनाम संवत्सर, चैत्र शुक्ल सप्तमी, शुक्रवार, दि. ४ एप्रिल २०२५, चंद्र – मिथुन राशीत, नक्षत्र – आर्द्रा, सुर्योदय- सकाळी ०६ वा. ३१ मि. , सुर्यास्त- सायं. १८ वा. ५२ मि.
नमस्कार आज चंद्र मिथुन राशीत राहणार आहे. आजचा दिवस उत्तम दिवस आहे. आजचा दिवस मेष, वृषभ, मिथुन, सिंह, कन्या, तुला, धनु, कुंभ व मीन या राशींना अनुकूल तर कर्क, वृश्चिक या राशींना प्रतिकूल जाईल.
दैनंदिन राशिभविष्य
मेष : जिद्दीने कार्यरत रहाल. आपले मनोबल आज उत्तम असणार आहे. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. काहींना आज अनपेक्षितपणे प्रवास करावा लागेल. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. तुमचे कार्यक्षेत्र वाढेल.
वृषभ : आर्थिक कामांकरिता आजचा दिवस आपणाला विशेष अनुकूल असणार आहे. मनोबल उत्तम राहील. तुमच्यावर असणारा ताण कमी होईल. कौटुंबिक जीवनात आनंददायी घटना घडेल.
मिथुन : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. गेले गों दिवस असणारी मानसिक अस्वस्थता कमी होईल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. तुमचे मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे.
कर्क : मानसिक दुर्बलता जाणवेल. काहींना नैराश्य जाणवेल. आज आपल्यापैकी काही जणांचा आराम करण्याकडे कल राहील. अनावश्यक कामात आपला वेळ वाया जाईल. प्रवास नकोत.
सिंह : दैनंदिन कामे होतील. तुमचे बौद्धिक अंदाज अचूक ठरणार आहेत. मनोबल उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील. तुमच्या सहकाऱ्यांचे तुम्हाला उत्तम सहकार्य लाभेल.
कन्या : आनंदी रहाल. आज आपण विशेष मनोबलाच्या जोरावर कार्यरत रहाल. आपले तेच खरे कराल. काहींना आपल्या कार्यक्षेत्रात विशेष सुसंधी लाभेल. मनोबल वाढणार आहे.
तुला : काल जाणवत असणारी अस्वस्थता आज कमी होईल. आपल्याला मानसिक स्वास्थ्य देणारी एखादी घटना घडेल. गेले दोन दिवस रखडलेली कामे आज आपण मार्गी लावू शकणार आहात.
वृश्चिक : आज आपले मन नाराज राहण्याची शक्यता आहे. चिंताग्रस्त रहाल. आज आपले मन आपण शांत व संयमी ठेवण्याचा प्रयत्न करावा. वाहने चालविताना विशेष काळजी घ्यावी.
धनु : मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमचे मन आनंदी व आशावादी राहील. आजची आपली सर्व कामे आपण विनासायास पूर्ण करू शकणार आहात. मनोबल वाढेल. प्रवासाकरिता आजचा दिवस आपणाला अनुकूल आहे.
मकर : मनोबल कमी असल्याने आज आपले कोणत्याही कामात लक्ष लागणार नाही. मानसिक अस्वस्थता जाणवेल. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. अनावश्यक खर्च होणार आहेत.
कुंभ : प्रियजन भेटणार आहेत. मनोबल उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. काहींना आज अनपेक्षित धनलाभ होणार आहेत. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढणार आहे.
मीन : मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. वैचारिक प्रगती होईल. नोकरी व व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल.
आज शुक्रवार, आज सकाळी १०.३० ते १२ यावेळेत राहु काल आहे. या काळात प्रवास, प्रयाण, नविन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इ. कामे वर्ज्य करावीत.
जन्मपत्रिकेवरुन वैयक्तिक मार्गदर्शन, विवाह गुणमेलन, भाग्यकारक रत्ने याकरिता संपर्क साधा- गार्गी ज्योतिषालय, संभाजीनगर, सातारा- 9822303054