सोशल मीडियाचा वापर कशासाठी
छायाचित्रात मार्गदर्शन करताना डॉ महेंद्र शिंदे, शेजारी व्यासपीठावर सौ सुनिता पानसे, डॉ नितीन कदम.
सोशल मीडियाचा वापर कशासाठी
समजले तर योग्य वापर होईल: शिंदे
वाई,
सोशल मीडिया ही आजच्या काळाची गरज आहे, पण तिचा वापर कधी, कुठे आणि कशासाठी हे पालक व पाल्य यांना समजायला हवं तरच त्याचा योग्य उपयोग होईल. सध्याच्या नव्या जगात आणि स्पर्धेच्या युगात मुलांच्या गरजा बदलल्या आहेत.याबरोबरच बदलायला हवं ते पालकत्व! नव्या युगाचे नवे पालक घडले तरच नवी पिढी घडू शकेल असं वक्तव्य श्री महेंद्र शिंदे यांनी केले. लोकमान्य टिळक स्मारक संस्था संचलित १०८ व्या वसंत व्याख्यानमातेच्या द्वितीय पुष्पात ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.नितीन कदम तसेच ब्लॉसम चिल्ड्रन अकॅडमीच्या माजी मुख्याध्यापिका सुनीता पानसे हे मंचावर उपस्थित होते.
नव्या युगाचे नवे पालक या विषयावर मार्गदर्शन करताना महेंद्र शिंदे म्हणाले प्रत्येक पाल्य हा त्याच्या स्वभावामुळे गुणामुळे व ग्रहण क्षमतेमुळे वेगळा ठरत असतो. चांगलं पालकत्व करण्यासाठी प्रथम आपल्या पाल्याचे हे वेगळेपण स्वीकारणे आणि त्याची इतर कोणाशी तुलना न करणे हे महत्त्वाचे आहे पाल्य ही पालकाची प्रतिमा असतात म्हणून पाल्याला चांगल्या सवयी, चांगले मूल्य देण्यासाठी प्रथम पालकांनी त्या सवयी, ती मूल्य अंगिकारली पाहिजेत कोणत्याही महान व्यक्तीचे चरित्र बघताना आपल्या लक्षात येईल की त्यात सर्वाधिक योगदान त्यांच्या पालकाचे आहे. जिजाऊ आणि शहाजी महाराजांनी स्वराज्य बनवण्याचा स्वप्न पाहिलं म्हणून शिवरायांना ते घडवता आलं आज प्रत्येक कुटुंबात तणाव आहे आणि हा तणाव आर्थिक नाही तर हा तणाव नातेसंबंधातील आहे पाल्याला सुधारण्याचा एकमेव मार्ग म्हणजे संवाद फर्स्ट कनेक्ट अँड करेक्ट 3 ते 13 या वयात पाल्य घडविणे पालकाच्या हातात असते त्यानंतर पालकांनी मुलांना सल्ले द्यावे पण त्याचे निर्णय त्यांनाच घेऊन द्यावेत पालकांनी पाल्याला सकारात्मक दृष्टिकोन देणे गरजेचे आहे पण ही सकारत्मकता वास्तववादी असावी पाल्याची क्षमता ओळखून पालकांनी अपेक्षा कराव्या अन्यथा पालकांच्या अपेक्षांच्या ओजांमुळे पाल्याची मानसिकता बिघडते शिस्त सातत्य व सवयी ही यशाची त्रिसूत्री आहे. यश गुणवत्तेमुळे मिळते पण चारित्र्यामुळे टिकते पुढच्या पिढीला ही चारित्र्य देण्याची जबाबदारी पालकाची आहे. नव्या युगातील पालकांची भूमिका महिंद्र शिंदे यांनी अत्यंत अर्थपूर्ण शब्दात स्पष्ट केले. डॉ. नितीन कदम यांनी अध्यक्षीय मनोगत केले मनीषा देशपांडे यांनी प्रस्तावना केली तर विनीत पोकळे यांनी परिचय करून दिला रविशा कानडे यांनी आभार मानले व्याख्यानासाठी श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते
———