मान्सून अंदमानमध्ये दाखल
मान्सून अंदमानमध्ये दाखल
पुणे – यंदा मान्सूनचा पाऊस वेळेवर येईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे आणि तसे संकेतही मिळत आहेत. १९ तारखेला, म्हणजे आज (रविवारी) मान्सून अंदमानमध्ये दाखल झाला.
भारतीय वेधशाळेने मान्सूनच्या आगमनाची १९ मे ही तारीख वर्तविली होती. तो अंदाज खरा ठरला. दरवर्षी २२ मे पर्यंत मान्सूनचे ढग अंदमानमध्ये प्रवेश करतात. यंदा तीन दिवस अगोदरच अंदमान, मालदीव आणि कोमोरिन येथे मान्सून दाखल झाला असून. अंदमानात मान्सूनचा पाऊस सुरूही झाला आहे, अशी माहिती पुणे वेधशाळेच्या हवामान विभागाचे प्रमुख के.एस.होसाळीकर यांनी दिली आहे.