राहत्या घरातून वृद्धा बेपत्ता
सातारा दि १ (प्रतिनिधी )
राहत्या घरातून एक वृद्धा बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 30 रोजी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या पूर्वी कोंडवे ता. सातारा येथील राहत्या घरातून सैकुल्ला मकबुल डांगे ही 82 वर्षीय वृद्धा राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता निघून गेली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.
***
महिलेस मारहाण केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा
सातारा दि १ (प्रतिनिधी )
महिलेस मारहाण केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 31 रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास वनवासवाडी, ता. सातारा येथील उषा गोविंद वाघमारे यांना किरकोळ कारणावरून तेथीलच जीना अहिरेकर आणि सोन्या अहिरेकर यांनी मारहाण केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.
***
जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
सातारा दि १ (प्रतिनिधी )
नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी एका विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 27 रोजी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास बसप्पा पेठ, सातारा येथील यशवंत हॉस्पिटलच्या अलीकडे रस्त्याच्या मधोमध जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने एअरटेल कंपनीची इंटरनेट वायफायची वायर आडवी लोंबकळत ठेवल्याने शिवानी आनंदराव कदम रा. करंजे नाका, सातारा यांच्या गळ्याला लागून त्या गाडीवरून पडल्याने जायबंदी झाल्या. या प्रकरणी एअरटेल कंपनीच्या इंटरनेट वाय-फाय वायरच्या मालकाविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार पवार करीत आहेत.
****
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा
सातारा दि १ (प्रतिनिधी )
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आकाश उर्फ गुड्ड्या ज्ञानेश्वर कापसे रा. कोडोली, सातारा याला सातारा शहरातून दोन वर्षासाठी हद्दपार केले असताना तो दि. 31 रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास झेडपी चौक परिसरात आदेशाचा भंग करून वावरत असताना आढळून आला.
दुसऱ्या कारवाईत, अनिकेत वसंत पाटणकर रा. चंदन नगर, कोडोली, सातारा हा दि. 31 रोजी दुपारी तीन वाजता हद्दपार आदेशाचे उल्लंघन करून झेडपी चौक परिसरात आढळून आला. या दोघांवरही हद्दपार आदेशाचा भंग केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
****
शाहूनगर मध्ये चैन स्नॅचिंग
सातारा दि १ (प्रतिनिधी )
शाहूनगर मध्ये अज्ञात चोरट्यांनी चैन स्नॅचिंग केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 31 रोजी पावणेचार वाजण्याच्या सुमारास शाहूनगर येथील अजिंक्य बाजार चौकाच्या अलीकडे असलेल्या मोकळ्या मैदानाजवळ कल्पना उमेश शिंदे रा. शाहूनगर, गोडोली, सातारा यांच्या पाठीमागून मोटरसायकल वरून आलेल्या दोन जणांपैकी मागच्या युवकाने त्यांच्या गळ्यातील 80 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र ओढून घेऊन ते पळून गेले आहेत. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भालेकर करीत आहेत.
*****
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा
सातारा दि १ (प्रतिनिधी )
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी दोन जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 30 रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास जीवनधारा फायनान्स, शाहूनगर, गोडोली, सातारा येथे सातारा शहर परिसरात राहणाऱ्या महिलेस शिवीगाळ, धक्काबुक्की केल्याप्रकरणी राजेंद्र सोपान यादव आणि शाहूराज राजेंद्र यादव दोघेही रा. शाहूनगर, सातारा यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार पोळ करीत आहेत.