पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देणार: ना.देसाई


पाटण तालुक्यात पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देणार
पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा :-पाटण तालुका हा डोंगरी तालुका आहे. त्यामुळे पाटण तालुक्यात पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर देणार असल्याचे, प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

Advertisement

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत आडदेव येथील रस्त्याचे भूमिपूजन पालकमंत्री श्री.देसाई यांच्याहस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळासाहेब पाटील, उपअभियंता संभाजी भंडारी विजय पवार,बाळासाहेब पाटील, हेमंत पवार, बबन भिसे यांच्यासह आडदेव गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाटण तालुक्यात रस्त्याचे जाळे निर्माण करणार असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, मतभेद न ठेवता पाटण तालुक्याचा विकास केला जाईल. दौलतनगर येथे जनता दरबारचे आयोजन करण्यात येत असून जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आडदेव गावाला टँकरने पाणी पुरवठा केला जात होता. जलजीवन मिशनच्या माध्यमातून या गावाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. पुढील काळातही या गावातील विकास कामे पूर्ण केली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिली.
0000


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!