सातारा वार्ता (03.02.2025)
डेमोक्रॅटिकचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन…
साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठेंच्या नावाची मागणी
सातारा (प्रतिनिधी )
देशाची राजधानी दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन परिसरास साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना जिल्हाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड व पदाधिकाऱ्यांनी दिले.
आपल्या साहित्याच्या माध्यमातून मराठी भाषेला जगविख्यात गौरव मिळवून देणारे तसेच संयुक्त महाराष्ट्र लढा मध्ये आपल्या शायरीच्या माध्यमातून अमूल्य योगदान देणारे , मराठी भाषेला तीस हजार नवे शब्द देणारे, त्यांचे साहित्य देश विदेशातील विविध भाषेत प्रसिद्ध झाले असून त्यांच्या साहित्यातून उमटलेले प्रतिबिंब जगाला हेवा वाटेल असे आहे म्हणूनच दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन परिसरास सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने देण्यात आले.
यावेळी सरिताताई आवळे, अभिजीत ननावरे, लक्ष्मण पोळ, मंगेश आवळे , अवि तुपे , ऋषिकेश वायदंडे , निलेश घोलप, सुनील भिसे , अभिजीत सकटे, रियाज बागवान व पदाधिकारी उपस्थित होते …
*****
जिल्हा रुग्णालयातील गैरसुविधांची जिल्हा प्रशासनाकडे तक्रार
दलित महासंघाचे साताऱ्यात धरणे आंदोलन
सातारा प्रतिनिधी
सातारा जिल्हा रुग्णालयांमध्ये स्वच्छता आणि सुविधा याबाबत प्रचंड अनास्था आहे .येथील प्रसाधनगृहांची बरेच दिवस स्वच्छता होत नाहीत रुग्णांची बेडशीटे दोन दोन दिवस बदलली जात नाहीत तसेच तंत्र सुविधांच्या बाबतीतही गोंधळ आहे अशी तक्रार दलित महासंघ पारधी हक्क अभियानाच्या जिल्हा उपाध्यक्ष उज्वला सुतार यांनी केली आहे .त्यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले पालकमंत्री शंभूराजे देसाई यांना निवेदन सादर करण्यात आले आहे .
निवेदनावर प्रताप पेरते , सुरेखा डुबल ,शितल गायकवाड , सुचिता मोहिते , अंकुश बत्रे, सुहास सपकाळ ,पंकज दीक्षित , विवेक ताटे, विनायक माळी, प्रवीण भोसले, यांच्या स्वाक्षरी आहेत
या निवेदनात तक्रार करण्यात आली आहे की जिल्हा रुग्णालयाचे नाव नावालाच क्रांतीसिंह नाना पाटील असे आहे .मात्र सेवा सुविधा तंत्र सुविधा याबाबत कुठेही क्रांती दिसून येत नाही .निवासी जिल्हा शिल्लक चिकित्सक डॉक्टर खाडे यांचे कुठेही काम दिसून येत नाही येथे स्वच्छतेच्या बाबतीत प्रचंड अनास्था आहे .शासन आरोग्य सुविधांवर कोट्यावधी रुपये खर्च करते मात्र जिल्हा रुग्णालयात कर्मचाऱ्यांचा अभाव आहे येथे नीट स्वच्छता होत नाही येथील रुग्णांची बेडशीट दोन दिवस बदलली जात नाहीत .
सिटीस्कॅन , एमआरआय ,सोनोग्राफी , डायलिसिस , मशीन येथे उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे .याबाबतचे निवेदन सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी या प्रश्नात लक्ष घालून सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी केली.
*****
माहुलीच्या महिला सरपंचाचे जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन
जातीय द्वेष करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांवर कारवाई करण्याची केली मागणी
सातारा दिनांक ३ प्रतिनिधी
ग्रामपंचायत सदस्य जातिवाचक शिवीगाळ करून कामकाजामध्ये ढवळाढवळ करत आहेत तसेच मानसिक छळ करून काम करण्यास रोखत असल्याची तक्रार करत माहुलीच्या सरपंच नूतन हनुमंत जाधव ग्रामपंचायत सदस्य छाया तुपे व अंजली निकम यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे .या प्रकाराची तक्रार जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे
जिल्हा प्रशासनाकडे सादर निवेदनात नमूद आहे की सचिन जाधव, ग्रामस्थ संजय जाधव, व विजय पवार हे आम्ही मागासवर्गीय महिला असल्याने वारंवार जातीवाचक शिवीगाळ करून अपमानित करतात .तसेच मानसिक छळ करून अपमान जनक वक्तव्य करतात रविवार दिनांक 26 जानेवारी रोजी येथील प्राथमिक शाळेत ध्वजारोहण झाले मात्र तेथे आम्हाला बाजूला ठेवण्यात आले आमचा सत्कार करण्यात आला नाही महिला वर्गाची येथे गळचेपी सुरू आहे .महाराष्ट्र हा पुरोगामी समजला जातो मात्र माहुली ग्रामपंचायतीत आम्हाला विनाकारण त्रासाला सामोरे जावे लागते येथे दुजाभावाची वागणूक मिळते अशी तक्रार करण्यात आली आहे या संदर्भात न्याय मिळण्याकरिता आम्ही बेमुदत धरणे आंदोलन करत असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे