सातारा क्राईम न्यूज
लोणंद येथे अपघातात कार चालकाचा मृत्यू
सातारा : खंडाळा तालुक्यातील लोणंद येथे लोणंद ते फलटण जाणार्या रस्त्यावर सॅन्ट्रो कार आणि टेम्पोचा अपघात दि. 8 जानेवारी रोजी झाला होता. त्या अपघातात कार चालकाचा मृत्यू झाला असून त्या अपघात प्रकरणी कार चालकावर लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेम्पो चालक संतोष मरळ रा. केळवडे याने दिलेल्या फिर्यादीवरुन सँट्रो कार चालक विकी अमोल शिंदे वय 25, रा. तरडगाव याने समोरुन सुपर कॅरी टेम्पोला धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. तसेच कार चालक विकी शिंदे याचा मृत्यू झाला तर त्याची पत्नी काजल विकी शिंदे वय 22 हि जखमी झाली. तसेच टेम्पो चालक संतोष मरळ हाही जखमी झाला. यावरुन दि. 3 फेब्रुवारी रोजी लोणंद पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
अल्पवयीन मुलीचा विनयभंग प्रकरणी एकावर पोक्सो
सातारा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग प्रकरणी एकावर पोक्सोंतर्गत सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महागाव येथील शिवाजी यशवंत कदम याच्यावर पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याने 10 वर्षाच्या मुलीसोबत ऑक्टोबर महिन्यापासून ते 26 डिसेंबर 2024 पर्यंत गैरकृत्य केले. त्या मुलीचे फोटो व्हिडीओही तयार करुन त्याद्वारे ब्लॅकमेलिंग केले. यावरुन त्याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
***
महिलेच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा
सातारा : महिलेच्या विनयभंग प्रकरणी एकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा शहर पोलीस ठाण्यात ऋषिकेश प्रताप चव्हाण वय 29, रा. जयविजय चौक, कोडोली याने महिलेच्या घरात जावून तिच्या पतीच्यासमोरच शिवीगाळ करत त्या महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा तपास सातारा शहर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस नाईक पवार या करत आहेत.
****
खंडणीसह जबरी चोरी प्रकरणी 13 जणांवर गुन्हा
सातारा : अवैध धंदा सुरु करण्यासाठी खंडणी मागून खिशातून रोख रक्कम जबरदस्तीने चोरुन नेल्याप्रकरणी 13 जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा शहरात मोळाचा ओढा येथे बंद पडलेला मटका व्यवसाय पुन्हा सुरु कर आणि त्याची मंथली पंचवीस हजार रुपये दे, अशी खंडणीची मागणी करत एका गँगने दोन जणांना मारहाण केली. मारहाणीनंतर त्या गँगने चालू महिन्याचा हप्ता म्हणून खिशातून चार हजार रुपये घेवून गेले. ही घटना दि. 3 रोजी दुपारी 4.30 वाजता घडली असून त्या गँगच्या 13 जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकाशवाणी झोपडपट्टी येथील प्रशांत बापूराव वायदंडे याने दिलेल्या फिर्यादीवरुन तो पानटपरीचा व्यवसाय करतो. सुरज उंबरकर, सागर उंबरकर (दोघे रा. मोळाचा ओढा), रेहान शेख, राहुल धबधबे (दोघे रा. तेलीखड्डा), निरंजन सोनार (ऱा. शुक्रवार पेठ) याच्यासह सहा ते सात जण अशा 13 जणांनी बंद केलेल्या मटका, जुगाराचा धंदा पुन्हा सुरु करुन अमोल वज्जाक याला महिन्याला 25 हजार रुपयांचा हप्ता दे, किंवा या ठिकाणी पान शॉप चालवायचे असेल तर प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये दे, असे म्हणाले. त्यास नकार दिला असता प्रशांत वायदंडे व त्याचा मित्र अल्ताफ जब्बार शेख या दोघांना लाथाबुक्कांनी मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. त्याचबरोबर तेरा जणांनी चालू महिन्याचा हप्ता म्हणून प्रशांतच्या खिशातले 4 हजार रुपये काढून घेतले. त्यावरुन त्या गँगच्या 13 जणांवर खंडणीचा शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
दहशतीचा प्रयत्न केल्याप्रकरणी 9 जणांवर गुन्हा
सातारा : सातारा शहरात शहर पोलीस ठाण्याच्या शेजारी असलेल्या जिल्हा कारागृहातून अर्थव अजय पवार रा. कोरेगाव यास जामीन मंजूर झाल्यानंतर त्याच्यासह 9 जणांनी दुचाकीवरुन रॅली काढून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत व्हिडीओ काढुन तो व्हिडिओ इंन्स्टाग्रॅमवर टाकल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पो. कॉ. सचिन रिटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अर्थव अजय पवार रा. कोरेगाव हा न्यायालयीन कोठडीत होता. त्यास दि. 18 जानेवारी रोजी न्यायालयाने जामीन दिला. त्याचा जामीन मंजूर झाल्यानंतर जिल्हा कारागृहातून तो बाहेर आल्यानंतर त्याचे मित्र निखील बर्गे, अक्षय बर्गे, राधेश्याम कदम, राज पवार यांच्या 9 जण त्याला नेण्यासाठी आले होते. अथर्व पवार हा बाहेर आल्यानंतर बेकायदेशीर सातारा शहरात जमाव जमवून त्यांनी दहशत निर्माण करत चिथावणीखोर घोषणा देत 6 दुचाकीवरुन सातारा शहरातून कोरेगावकडे गेले. त्याचा व्हिडीओ करुन सोशल मीडियावर व्हायरल केला. त्याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला असून याचा तपास महिला पोलीस नाईक शिंदे या तपास करत आहेत.