मुलींच्या निवासी शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरू
चांडोली येथील मुलींच्या निवासी शाळेत
प्रवेश प्रक्रिया सुरू
पुणे, दि. २२: शैक्षणिक वर्ष २०२४-२५ या वर्षाकरीता अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा चांडोली ता. खेड येथे इयत्ता ६ वी ते १० वी ( सेमी इंग्रजी व मराठी माध्यम) वर्गांतील विद्यार्थीनींसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्याध्यापक एम.व्ही. जाधव यांनी दिली आहे.
अनुसूचित जातीच्या विद्यार्थीनींसाठी ८० टक्के, दिव्यांग प्रवर्ग ३ टक्के, अनूसूचित जमाती १० टक्के, विमुक्त जाती व भटक्या जमाती ५ टक्के व विशेष मागास वर्गातील विद्यार्थ्यांसाठी २ टक्के आरक्षित जागा आहेत. निवासी शाळेत प्रवेश घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज मुख्याध्यापक, अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा चांडोली येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत उपलब्ध देण्यात आले आहेत.
ई लर्निंग अध्यापन सुविधा, मोफत भोजन व निवासाची सोय, स्वच्छ वातावरण व सुसज्ज इमारत, विविध खेळ व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, स्वतंत्र प्रयोगशाळा व ३ हजार पुस्तकांचे भव्य ग्रंथालय व वाचनालय, स्वतंत्र भव्य क्रीडांगण, ई- ग्रंथालय, दरवर्षी स्नेहसंमेलन, क्रीडा स्पर्धा व सहलीचे आयोजन, विज्ञान केंद्र आदी या शाळेची वैशिष्ट्ये आहेत.
प्रवेशाबाबत अधिक माहितीसाठी मुख्याध्यापक एम.व्ही. जाधव ७२१८०१३५११ आणि गृहपाल श्रीमती ए. एस. अनामिका ९०११४६१२३२ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
0000